पांगुळगाडा

सप्रेम नमस्कार,

एक २५ वर्षांचा मुलगा आहे, पोलिओमुळे कमरेपासुनचे दोन्ही पाय लुळे आहेत…

गेल्या चार महिन्यांपासुन मी त्याला काम करण्यासाठी विनवत आहे…

जिद्द हरवुन बसलेला हा मुलगा भिक मागतो… काम करायला अजिबात तयार होत नव्हता…

म्हणुन मग सुरुवातीला फक्त औषधी दिली – मग मैत्री केली – त्यानंतर जीवाभावाच्या गोष्टिंची देवाण घेवाण सुरु केली – घट्ट विश्वास निर्माण झाल्यावर त्याच्यात तो “माणुस” असल्याची… “तरुण” असल्याची… “पुरुषार्थाची” आणि मुख्य म्हणजे भिक मागण्याची “लाज” वाटण्याची भावना निर्माण करत गेलो…

यात खुप वेळ गेला माझा, पण सांगायला आनंद होतोय की माझा हा वेळ सत्कारणी लागला…

हा तरुण मुलगा काम करायला तयार झालाय,.. एक तरुण मुलगा भिक्षेक-यांतुन वजा होईल… पोलिओ मुळे पांगळा असुनही “स्वतःच्या पायावर” उभा राहील… यापेक्षा माझा आनंद आणखी दुसरा कुठला असेल…?

मला आपली मदत हवीय…

हा मुलगा अतिशय प्रामाणिक आहे हुशार आहे. बसुन करण्याजोगे कुठलेही काम हा लिलया करु शकतो. एका जागेवरुन दुस-या जागेवर त्याच्या सरकणा-या पाटासारख्या गाडीवरुन जावु शकतो.

याला आपल्या ओळखीत जर पुण्यात कुठे बैठे काम मिळाले तर मी आपला उपकृत राहीन…

शक्यतो हे काम निवासी स्वरुपाचे असल्यास बरे होईल (म्हणजे काम करुन उरलेल्या फावल्या वेळात भिक मागावी अशी त्याला ईच्छा होणार नाही आणि दिलेल्या कामात तो गुंतुन राहील)

बसुन पॅकिंग करणे, धान्य / भाज्या निवडणे, फरशी पुसणे, झाडु मारणे, हलक्या वस्तु इकडुन तिकडे पोचवणे, हरकाम्या म्हणुन इतरही काही कामं करणे अशा प्रकारचे काम तो करु शकतो…

या माझ्या पोराला लवकर काही काम मिळावं अशी हात जोडुन प्रार्थना !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*