कोणत्याही आजारावर औषध नकोच… फक्त योग आसन… विश्वास ठेवा…

सप्रेम नमस्कार…

मी डॉ. मनिषा सोनवणे…! मेडिकल डॉक्टर… आणि योग शिक्षीकाही….!!!

१९९९ साली डॉक्टर झाले तेव्हा असं वाटलं, की चला आता भराभर सगळे पेशंटस् बरे करण्याची आपल्याला जादुची छडी मिळाली… मी हवेत होते…

पण दवाखान्यात प्रत्यक्ष पेशंटस् चेक करायला सुरुवात केल्यावर माझे पाय जमीनीवर आले…

कित्येक आजारांवर ऍलोपॅथी मध्ये औषधं उपलब्धच नाहीत… जी औषधे आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स इतके की भीक नको पण…!

कितीही औषधं दिली तरी तात्पुरतं बरं वाटुन पेंशंट पुन्हा काही दिवसांनी दारात हजर… देणेक-यांसारखा…

मी खुप विचार करायचे, यावर काय उपाय करता येईल…?

मी स्वतः आयुर्वेद पारंगत असल्यामुळे ऍलोपॅथी च्या जोडीला आयुर्वेदीक औषधंही देवु लागले…

आता फरक थोडा जास्त होता… पण चिवट आजार म्हणावे तसे काही पिच्छा सोडत नव्हते… पेशंटस् चा आणि माझाही…!

मग मी योगा चा आधार घेवु लागले… प्रत्येक आजारावर योगाचे एक आसन देवु लागले… आणि काय आश्चर्य… चिवट आजाराचा प्रत्येक पेशंट पुन्हा तोच आजार घेवुन यायचा बंद झाला की…!

मग मी उलटा प्रयोग चालु केला… आजारांवर औषधी देण्याऐवजी मी फक्त योगाचे आसन सांगु लागले… आणि जवळपास प्रत्येक आजार हळुहळु बरा होवु लागला… कुठल्याही गोळी औषधांशिवाय!!!

तशी मी डॉक्टर असुनही योग शास्त्रातली पदवी घेतली आहे, त्यानिमित्ताने या विषयाचा माझा ब-यापैकी अभ्यास झालाय शिवाय मुळात डॉक्टर असल्यामुळे योग आणि शरीर शास्त्र यांची मी सांगड घालायला लागले…

मी प्रयोग करत गेले, आणि १० वर्षांच्या माझ्या या प्रयोगांतुन मी माझ्यापुरतं एक टेक्नीक डेव्हलप केलंय Disease Wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने

मग मी माझ्या पुण्यातल्या पाषाणच्या योगा सेंटर मध्ये केवळ Disease Wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने घेवु लागले… एकही औषध न देता…

डायबेटीस, हृदयाचे आजार, ब्लडप्रेशर, गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, फ्रोझन शोल्डर, अतीचिंता, तणाव, डिप्रेशन, पी. सी. ओ.डी., महिलांचे इतर आजार यावर एकही गोळी न देता केवळ योगाची ठरावीक आसनं घेवुन हे आजार बरे होतात यावर कुणाचाच विश्वास बसत नाही… पण हे १०० टक्के खरंय…!!!

योगासन ट्रिटमेंट पुर्वीचे रिपोर्टस् आणि योगासन ट्रिटमेंट नंतरचे रिपोर्टस् यांत जमीन अस्मानाचा फरक असतो… आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे पेशंटस् च्या चेह-यावर रोगमुक्त झाल्याचं समाधान… एका डॉक्टरला आणखी काय हवं असतं…?

आपल्या या प्राचीन योगशास्त्राला अनुसरुन आपण आपली जीवनशैली ठेवली तर, कदाचीत कोणत्याही ऑपरेशनची भिती भविष्यात उरणार नाही…!

जुनाट सर्दी, दमा, वजन वाढवणं किंवा कमी करणं, थायरॉइड… हे फक्त योगासनाने शक्य आहे? होय आहे…

यामागे शास्त्रीय कारणं आहेत… म्हणुन हे आजार फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने करवुन घेतलेल्या योगा च्या आसनाने बरे होतात… १०० टक्के नाही… ११० टक्के…!!!

लोकांनी गोळ्या औषधींच्या नादी लागुन हजारो रुपये घालवु नये…

गोळ्या औषधी घेवुन स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवु नये…

एक आजार बरा करण्यासाठी इतर १० आजार मागे लावुन घेवुन नये… याचसाठी हा सर्व लेखन प्रपंच…!!!

तेव्हा चला योगासनाने सर्व आजार घालवु आणि तुमच्या सध्याच्या चालु असलेल्या गोळ्या औषधींना करु बाय बाय, कायमचा…!!!

डॉ. मनीषा सोनवणे
ग्रामसंस्कृती उद्यान
सोमेश्वर मंदीर समोर, सोमेश्वर वाडी , पुणे
८३०८३१५४९४ / ९४२२०१७३४२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*