होय… हा तोच वाईचा मुलगा…
ज्याचं ऑपरेशन झालं…
ऑपरेशननंतर आभाळमाया ने त्याला आसरा दिला…
येत्या ८ – १० दिवसात हा काम करु लागेल…
आज याच्यासाठी नोकरीही पक्की केली…
आज याच्यात असणा-या भिक्षेक–याला श्रद्धांजली वाहीली….
आज याच्यातल्या माणसाचं थाटात बारसं घातलं….
हा नव्यानं आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहीला…
कोण म्हणेल हा दोन महिन्यांपुर्वी भिक मागत होता? फुटपाथवर बेवारस पडुन होता?
बस्स, आज फार काही लिहित नाही…
त्याचं बसणं, उभं, राहणं, त्याची देहबोली आणि चेह-यावरचा आत्मविश्वास सगळं बोलतोय…
बोलुदे…
आज मलाही शांत बसुन कौतुकानं त्याच्याकडं पाहुदे…!!!
Leave a Reply