सगळेच आधार तुटलेली एक आजी… तीची सोय यापुर्वी एके ठिकाणी केली होती. परंतु तीच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे जास्त दिवस तीला या ठिकाणी राहता आले नाही. ज्यांनी तीला इतके दिवस आईप्रमाणे सांभाळले त्या सर्वांचा मी ऋणी आहे!
आता ऐनवेळेला हिची सोय करणं हे खरं जिकीरीचं काम…
आजचा आख्खा दिवस, या आजीला कोण आसरा देतंय का हे पाहण्यात गेला… धो धो पाउस… फोनही लागेनात… रस्त्यावर पुर… वेळ सरत चालली… हिला रात्री ठेवायचं कुठं..?
हि आजी दिवसभर आमच्याबरोबर… आशेनं तोंडाकडे पहात होती… आणि दोन तासांच्या आत हीची सोय कशी करावी या विवंचनेत आम्ही…
शेवटी माझे सातारचे मित्र रवी बोडके यांना हक्कानं फोन केला… या माझ्या मित्रानं सांगीतलं… “आजच… आत्ताच पाठवा आजीला…”
मी, भुवड ताई आणि बाबा – आम्हां सर्वानाच केव्हढा आधार मिळाला या वाक्यांनी…
शेवटी, आजीला पोचवलं एकदाचं साता-याला..! विशाल यादव हा माझा मित्र आजीला नेवुन सोडुन आता परतीच्या मार्गावर आहे…
या सा-याचं श्रेय फक्त आणि फक्त भुवड ताई आणि बाबांचे… ही दोन्ही “माणसं” या आजीसाठी रात्रभर जागी आणि पुन्हा दिवसभर माझ्यासोबत… तीच्यासाठी डब्बा घेवुन…
मी फक्त मध्यस्थ म्हणुन होतो..!
आज रवी बोडकेंनी ऐनवेळी मदत केली नसती तर..?
रवी या व्यक्तीला माणुस म्हणायचं की देव ? असा प्रश्न पडावा असा हा अवलिया आहे…
रवी बोडके (९९२२४२४२३६) रस्त्यावरील निराधार लोकांना आपल्याकडे आणतात आणि त्यांचा सांभाळ करतात… आयुष्यभर..! आणखीही बरंच काही करतात, सामान्य माणसाला खोटं वाटेल इतपत..!!!
वाटतं तितकं सोपं नाही हे काम..!
रवी सलाम तुम्हाला… यार..!
धन्यवाद म्हणुन ऋणातुन मुक्त होता येत नाही..! होणारही नाही!!
Leave a Reply