भिक्षेकरी ते कष्टकरी

सादर प्रणाम,

लोकसहभागातुन भिक्षेक-यांकरीता मी करत असलेल्या कामाला आपण भरभरुन प्रतिसाद देत आहात याबद्दल मी मनोमन ऋणी आहे.

रस्त्यातच औषधी देणं/ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं, नाती निर्माण करुन त्यांना काम करायला लावुन स्वतःच्या पायावर उभं करणं आणि जे आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहेत त्यांना वृद्धाश्रमात दाखल करणं हे माझ्या कामाचं ढोबळ स्वरुप..!

यापुढेही एक पाउल टाकण्याचा माझा विचार आहे तो असा की, या लोकांना काही स्कील्स शिकवणं: उदा. टेलरींग, पेपर मेकींग, कृत्रीम फुलं बनवणं, परफ्युम तयार करणं इ. इ.

हे स्कील्स शिकवण्यामागे अनेक हेतु आहेत…

  1. भीक मागण्याच्या वेळेतच त्यांना एका जागी बोलावुन वरील प्रकारचं शिक्षण द्यायचं, जेणेकरुन भीक मागण्याची वेळ टाळता येईल. (व्यसनी लोकांची वेळ असते, व्यसन करायची, ती वेळ टळली तर व्यसन ब-याच प्रमाणात कमी होते… याच धर्तीवर भीक मागण्याची वेळ टाळणं हा हेतु ! )
  2. ज्या दिवशी ते आपला वेळ देवुन काही शिकायला येतील, त्या दिवसाचा त्यांना स्टायपेंड देणं. (नाहीतर त्यांचा चरीतार्थ कसा चालेल? शिवाय शिकण्यामध्ये काही रस राहणार नाही..! )
  3. त्यांनी बनवलेल्या वस्तु मॉल अथवा तत्सम ठिकाणी विकुन येणा-या पैशातुनच हा स्टायपेंड त्यांना दिला जाईल…

यातुन भीक मागण्याची सवय सुटेल, रोज पैसा हाती मिळाला तर भीक मागण्याची गरजच नष्ट होईल… माझ्या मते हा मुळावर घाव बसेल..!

शिवाय मिळालेल्या स्कील्स च्या आधारे त्यांना भविष्यात त्यांचा स्वतःचा छोटा व्यवसाय टाकता येईल… ते आणखी दोन लोकांना काम देवु शकतील…

कदाचीत ही साखळी वाढत जाईल…

भिक्षेकरी ते कष्टकरी… या मी पाहिलेल्या स्वप्नापर्यंत नेणारी एक छोटी का होईना… एक पायवाट तरी तयार होईल..!

अर्थात ज्या सहजतेने हे लिहितोय, तितकं सहज हे काम नाही याची जाणिव आहे मला… जागा लागेल, प्रशिक्षित लोक लागतील, पैसा लागेल आणखीही बरंच काही…

पण प्रयत्न नक्कीच करणार आहे… अर्थात आपल्या आशिर्वादाच्या बळावरच !

हा भविष्यातील माझा प्लॅन आहे…

या प्लॅनला तडीस नेण्यासाठी आत्ता मात्र मोठ्या प्रमाणावर “Baseline Survey” करणं गरजेचं आहे. या सर्व्हेमध्ये त्यांच्या मुलभुत बाबी मला समजतील, आणि त्यानुसार वरील प्लॅन साठी योग्य ती पावले उचलता येतील.

Baseline Survey साठी आत्ता खालील बाबींची सोय करणे हे ओघाने आलेच

  1. सर्व्हे करण्यासाठी स्वयंसेवक (Volunteers)
  2. संपुर्ण माहिती साठविण्यासाठी एक लॅपटॉप
  3. प्रिंटिंग, झेरॉक्स स्कॅन करु शकणारा मल्टी फंक्शनल प्रिंटर
  4. वर्षानुवर्षे कागदपत्रं जतन करण्यासाठी / लॅमिनेशन करण्यासाठी लागणारे लॅमिनेशन मशी

सध्या रोजच्या कामासह वरील बाबींची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

बेसलाईन सर्व्हेचा थोडक्यात अहवाल आणि त्यानंतर उचलणार असलेल्या पावलांविषयी माहिती देईनच.

आपण वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहात, शुभेच्छा देत आहात…

लोकसहभागातुनच माझं हे काम सुरु आहे, म्हणुन मी घेत असलेल्या ऍक्शन विषयी आपणांस माहिती असावी, जेणेकरुन मला योग्य ते दिशादर्शन मिळेल, अनावश्यक बाबी टाळण्यात आपले मार्गदर्शन मिळेल म्हणुन आजचा हा लेखन प्रपंच…

वरील बाबींची पुर्तता झाली की हा सर्व्हे सुरु करीत आहोत..!

1 Comment

  1. Great work and really needed as these are the most hated and unwanted people by society.
    We are here to support your job

Leave a Reply

Your email address will not be published.


*