कोरी वही

एक पिढी भिक मागत जगली…

दुसरी पिढी मागंच उभी आहे… शिकावं की भिकच मागत जगावं, या विवंचनेत…!

“तुझं झालं गेलं, आता पोरांना तरी शिकु दे गं माये…” या माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत शेवटी या माउलीनं मुलाला शाळेत घालायची तयारी दाखवली…!

आज लागणारी सर्व वह्या पुस्तकं या माऊलीला सुपुर्द केली… लहानग्याने लगेच रंगपेटी उघडुन, नव्या को-या वहीवर हरखुन आडव्या तिडव्या रेघोट्या मारायला सुरुवात केली… आईनं झट्कन् वही आणि रंगपेटी त्याच्याकडनं काढुन घेतली आणि माझ्याकडं तिरक्या नजरेनं पहात त्याला म्हणाली, “गप… उगं खराब करु नगंस… डाक्टर रागवत्याल…”

मी हसलो… परत त्या लहानग्याच्या हातात रंगपेटी आणि नवी वही देत मी म्हटलं, “अगं खराब नाही करत तो, “को-या” वहीत “रंग” भरतोय तो… भरुदे… आख्खी वही अशीच “रंगीत” होवुन जावु दे…!!!”

तीला काय कळलं माहीत नाही… पण हसत म्हणाली, “तुमी म्हणताय तसंच होवुंद्या डाक्टर…!!!”

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*