अगरबत्ती….! या ब्लॉगमधील आजीचं पुढं काय झालंय याची सर्वांनाच उत्सुकता आहे… तसे शेकडो फोन मला येवुन गेले…
तर या आजीचे डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. तीला व्यवस्थित दिसायला लागलंय.
या आजीची कायमस्वरुपी सोय करणेबाबत एका संस्थेशी बोलणी चालु आहेत. १६ ऑक्टोबर पासुन बहुधा ती या संस्थेत दाखल होईल (कुठे, काय, कधी, कसं? याविषयी सांगेनच नंतर…)
अगरबत्ती म्हणुन ती आता या संस्थेत दरवळत राहिल !
नेमका डॉ. मनिषाचा वाढदिवस १६ ऑक्टोबरला असतो…
सहज म्हटलं तीला, “वाढदिवसाला काय हवंय?”
ती म्हणाली, “या दिवशी ज्या बाईला आपण आई मानलं, तीला कायमचं घर देतोय, माणसांत आणतोय… तीचे मनापासुन आशिर्वाद मिळतील आपल्याला. याहुन मोठं काय आहे तुझ्याकडं देण्यासारखं…?”
खरंच आहे ते…!
आता ती माई हयात असेपर्यंत किंवा मी हयात असेपर्यंत, आई म्हणुन तीची जबाबदारी घेण्यास आम्ही बांधील आहोत, आयुष्यभर..!
इथुन पुढे फुटपाथचा वापर ती चालण्यासाठीच करेल… घर म्हणुन राहण्यासाठी नाही…
१६ ऑक्टोबरला तीच्यातल्या भिक्षेक-याचा अंत होईल… पण माणुस म्हणुन तीचा नविन जन्म होईल..!
हा तीचाही वाढदिवसच, नाही का…?
माई आणि मनिषा, तुम्हां दोघींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
Leave a Reply