बडे भैय्या

हि तरुण पोरगी, एका धार्मिक स्थळाबाहेर भिक मागायची… वय असावे २८ – ३० वर्षे…. मुलं बाळं घेवुन यायची भिक मागायला..!

गेल्या सहा महिन्यांपासुन हिच्याबरोबर बहिण भावाचं नातं स्थापन करतोय…

मला ही “बडे भैय्या” म्हणते…

हिच्या मुलांना आता शाळेत टाकलंय…

ज्या धार्मिक स्थळाबाहेर भिक मागते, तेथील ट्रस्टींना भेटुन, हात जोडुन विनंती केली… हिला, झाडु मारण्याचं काम द्या… पगार द्या… एक भिक्षेकरी कमी होईल

ट्रस्टी म्हणाले, “वल्लाह… क्या बात है… हमने कब मना किया भाई… सफाई करेगी तो खुदा और बरकत देगा… हम इसको पगार भी देंगे… आप कलसे उसको काम पे लाना…”

कालपासुन ही मुलगी झाडु मारायचं काम करायला लागलीय… आता चांगला पगार मिळेल…!

बिना नमाझ पढे, अल्लाह ने मेरी सुन ली… मेरी नमाझ कबुल हो गयी…!!!

या अल्लाह…. तेरी रहमत…!!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*