आई…

ती आई झाली… बाळ सातव्या महीन्यात जन्मलं… बाळ मोठं झालं… तीला कळलं हे बाळ मतिमंद आहे… आयुष्यं याचं जास्त नाही…

ती याला शिकवायला लागली… याला ती सरळ रेषा काढायला शिकवायची… याला कधी सरळ रेषा काढायला जमलीच नाही… कशी जमेल?

ही खुप चिडायची, आदळआपट करायची… म्हणायची, “किती शिकवु तुला…? एक साधी सरळ रेष ओढता येत नाही तुला…? सगळ्या वाकड्या तिकड्या, आडव्या ऊभ्या रेषा…?”

हा घाबरायचा… पुन्हा सरळ रेष ओढण्याचा प्रयत्न करायचा… नाहीच जमलं याला कधीच…

एक दिवस हा आय सी यु मध्ये…

ईसीजी ची रेषा इथं सरळ… डॉक्टरांचं तोंड वाकडं…

ही रडत होती… हंबरडा फोडत म्हणाली, “बाळा सरळ रेष नको रे… वाकडी तिकडी… आडवी उभीच राहु दे… चालेल मला… प्लिज…!!!”

आज हा घाबरला नाही… सरळ रेष वाकडी करण्याचाही याने प्रयत्न केला नाही… तो होताच कुठं…?

तीनं मात्र ही सरळ रेष जपुन ठेवलीय मनात… गेलेल्या बाळाची आठवण म्हणुन…!!!

 

1 Comment

  1. Khup khup khup sundar!!! Bhishan vastav pan apratimrittya mandala aahe aapan Sir….
    Aajcha aapla Kolhapur yethil Tendulkar Vyakhyanmalemadhil vyakhyan suddha atulniya zala….. Pratyaksha field work madhe sahabhagi vhyayla nakki awadel…
    Thank you so much!!! ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*