शौचालय…???

एक बाबा सुलभ शौचालय (पब्लिक टॉयलेट) शेजारी बसुन भिक मागायचे.

डोळ्यांनाही दिसत नसायचं…
मग डोळ्याचं ऑपरेशन करुन घेतलं.

नंतर समजलं ते जीथं बसतात त्या टॉयलेटला कुणी Care Taker नाही…

या बाबांना सारखं सांगायचो, “बाबा बसुनच भिक मागताय तर या टॉयलेटचे Care Taker व्हा… बसुनच रहायचंय..! कष्ट काहीच नाहीत शिवाय पैसे मिळतील !”

ब-याच दिवसांनी त्यांनाही पटलं असावं…

आजपासुन हे “जॉईन” झाले… “सुलभ शौचालयाचे” Care Taker म्हणुन!

आधी टॉयलेटच्या भिंतीबाहेर “भिक” मागायचे… आता टॉयलेटच्या भिंतीआत “काम” करतात..!

भिंतीबाहेर “भिक्षेकरी” होते, भिंतीआत “कष्टकरी” झाले.

एरव्ही “दरी” पाडणारी भिंत आज एक “पुल” झाली…

संदर्भ कसे बदलतात ना?

ही भिंत रस्त्यावरुन ओलांडायला खरंतर चार सहा पावलंच लागतात… पण ही सहा पावलं टाकायला, भिंत ओलांडायलाही बाबांना खुप वर्षे लागली..!

असो, या एका निर्जीव भिंतीमुळे बाबांच्या आयुष्यात सावली आली..!

बाबांचं आयुष्य आता “सुलभ” होईल..

शौचालय” कडे कुणीच चांगल्या नजरेनं बघत नसावेत…

पण… निर्जीव आणि दुर्लक्षित अशा या शौचालयानंही कुणाचीतरी मदत केली स्वच्छ मनानं… खरंच हे शौचालय किती निर्मळ… !!!

समाजातली “विष्ठा” ते आपल्यात सामावुन घेतंच… पण समाज ज्याला “विष्ठा” समजतो… त्या सामाजीक विष्ठेलाही आज या शौचालयानं सामावुन घेतलं…

भिक्षेक-यापासुन ते कष्टक-यापर्यंतच्या बाबांच्या या प्रवासात साथ देणाऱ्या या शौचालयास माझा खरंच नमस्कार…!!!

आता माझ्यासाठी हे शौचालय नव्हेच… हे तर स्वच्छालय!!!

1 Comment

  1. कधीकधी संदर्भ स्वतःहून नसताता बदलत…. त्यासाठी आपल्यासारख्या ध्येयवेड्या व्यक्तींनाच changer व्हावं लागतं…. जे आपण स्वतः तर झालातंच शिवाय आम्हांला सुद्धा changer होण्याची प्रेरणा पावलो पावली देत आहात…
    खुप खुप धन्यवाद ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*