महिना १५० पगार

ही आजी मंदिराबाहेर भिक मागायची – मंदिराबाहेर झाडु मारण्याच्या कामाला तयार केलं – पगार महिना १५०/-

महिनाभर काम करुन आजीनं काम सोडलं.

“का?”

“१५० रुपयांत महिना कसा भागवु बाबा?”

“खरंय”, मी तीला म्हटलं, “तेच काम कर – मी तुला २००० माझ्याकडचे महिना देतो, रात्र निवारा प्रकल्पात रात्री झोपण्याची सोय करतो”

आजी आजपासुन पुन्हा कामाला लागली, पण गणित केलं – वर्षाचे रु २४०००!

कसे… कुठुन आणायचे..?

बघु, ज्यानं बोलायची बुद्धी दिली, तीच शक्ती काहीतरी करेल…!!!

आज्जी नव्या उमेदीनं कामाला तरी लागली…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*