केवळ माहितीस्तव

नमस्कार !

आपणां सर्वांच्या सहकार्यातुन आजपावेतो  १६० भिक्षेकरी आजी आजोबांच्या डोळ्यांचे मोतिबिंदु ऑपरेशन पार पडले आहेत. व आता त्यांची नजर /दृष्टी नॉर्मल लेव्हलला आली आहे.

११० लोकांना त्यांना आवडतील त्या फ्रेमचे चष्मे करुन दिले आहेत. चष्म्याच्या सहाय्याने हे लोक व्यवस्थित पाहु शकतात.

जे केवळ औषधी व ड्रॉप्सने बरे होवु शकतील, अशा २०० पेक्षाही जास्त आजी आजोबांना औषधांच्या माध्यमातुन स्वच्छ नजर प्राप्त झाली आहे.

हे सर्व आपणांस सांगण्याचं कारण हे की, त्यांच्या आयुष्यात घडलेला हा बदल केवळ आपण केलेल्या शारीरीक आर्थिक आणि मानसिक मदतीमुळे झाला आहे.

मी यात नाममात्र आहे !

मी यात फक्त समन्वयकाचे / Coordinator चे काम केले आहे.

सारं श्रेय आपलंच आहे..!

मी “कोण” ? यांना “दृष्टी” देणारे आपण आहात..!

आधी हे लोक नुसतंच “पहात” होते, आता यांना “दिसायला” लागलंय…! तुमच्यामुळे !!!

आधी “जवळची नजरही” कमी होती… आता त्यांना “दुर – दृष्टी” मिळाली….

याचेही धनी आपण आणि आपणच आहात…!!!

हे सर्व करण्यामागे अनेक हेतु आहेत:

  • रात्री / संध्याकाळी दिसत नसल्यामुळे यांचे ऍक्सिडेंट होतात. ऍक्सिडेंट मुळे या वयात कायमचे व्यंग तरी येते किंवा मृत्यु तरी होतो. (ज्याचे सोयरसुतक शक्यतोवर कुणालाही नसते) दोन्हीचे प्रमाण या माध्यमातुन रोखता यावे. .
  • केवळ दिसत नाही म्हणुन, या वयातही त्यांची होणारी फसवणुक थांबवणे.
  • एकुणच Quality of Life सुधारणे.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, काम करायला प्रवृत्त केल्यावर, “आमाला दिसत न्हाय रं बाबा, न्हायतर केलं आसतं काम” असा बहाणा करण्यापासुन त्यांना रोखणे…!

तर….

पुण्यातील वेगवेगळ्या भागातील भिक्षेक-यांच्या यापुढच्या बॅचचे ऑपरेशन आणि तपासण्या आज २४ जानेवारीला मुकुंदराव लेले हॉस्पिटल, शनिवारवाड्याजवळ, पुणे येथे सकाळी १०:३० वाजल्यापासुन आयोजीत केल्या आहेत.

यांच्याशी कोणाला संवाद साधायचा असेल, तर वरील पत्त्यावर आपलं स्वागत आहे !

जो बदल आपल्यामुळे घडलाय, घडतोय आणि घडणार आहे; त्या घटनांचं प्रत्यक्ष साक्षीदार असणं, या सारखं दुसरं सुख नाही..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*