आज सोमवार २८/०१/२०१९. पुन्हा एकदा देवळा बाहेरील देव-माणुस डॉ.अभिजीत सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स यांना भेटण्याची संधी मिळाली.
पंधरा दिवसांपुर्वीची पोष्ट ग्रुपवर वाचल्यानंतर डॉ.शी संवाद साधुन भेटण्याची इच्छा निती मॅडमने व्यक्त केल्यामुळेच मला देखील सरांची नियोजित वेळ कळाली. ठरल्यावेळी अन वारांला डॉ.चा राऊंड हा शहरातील विविध धर्मस्थळांचे बाहेर मंदिर, मशिद, चर्च…
रस्त्यावरच भरत असल्याने त्यांना भेटुन शक्य ती मदत करण्यासाठी संवेदनशील माणसे आप आपल्या भागात अगर दूरुनही डॉ.चे संपर्कात स्वयंसेवक म्हणुन दाखल होत असतात. आज देखील तसेच घडले.
निती मॅडम चे परिचयातुन खास अहमदाबाद येथील श्री.संजीव पंडित हे उपस्थित होते. त्यांनी डॉ. चे कार्य जाणुन घेत प्रत्यक्ष सेवा पाहुन आपले समाज कर्तव्य म्हणुन लागलीच १००००/- मदत सरांकडे सुपुर्त केली.
त्यांना देखील ती खरोखरच गरजवंतासाठी खर्च होत असल्याचे पाहुन समाधान लाभले. डॉ.सोबत १ – १ १/२ तास व्यतीत करुन तेथील आज्यांशी त्यांनी संवाद साधला. संजीवजी व निती मॅडमने डॉ.चे ह्या पेशंटची माहिती देखील फाँर्मवर भरुन घेण्याची सेवा दिली.
डॉक्टरांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन एक मावशी कामाला तयार झाली, निती मॅडमनेही त्यांना स्वयंपाक करण्याचे काम मिळवुन देने साठी कबुल केले.
एका भिक्षेक-याला कष्टकरी बनवण्याच्या निती मॅडमच्या संवेदनशीलतेला माझा सलाम
सैनिकमित्र प्रताप भोसले हे देखील तेथे येवुन सरांचे कार्याने भारावुन गेले.
तर खास इस्लामपुरवरुन आलेले, जागतिक स्तरावर समाजकार्यात अग्रेसरपणे कार्यरत असलेल्या जायंटस् ग्रुप आँफ इस्लामपुर चे अध्यक्ष इंजि. सुनिल तवटे हे देखील सरांना त्यांचे ग्रुपचे नविन कार्यकरणी शपथविधी पदग्रहन सभारंभ प्रसंगी पाहुणे म्हणुन आमंत्रित करण्यास आज मोरया गोसावी मंदिराचे प्रवेश द्वाराशी उपस्थित होते
तर इतरही स्थानिक युवा कार्यकर्ते सरांशी संवाद साधत आपआपल्या परीने सेवा देण्याचे वचन देत संपर्क नंबरची देवाण – घेवाण करत होते.
नंतर धनेश्वर मंदिराचे प्रवेश द्वारावर देखील डॉ. चा रस्त्यावरचा दवाखाना भरला…
तेथे रुपालीताई देवरे देखील मातृतुल्य आज्यांचा सहवासाचा अल्पसा का होईना लाभ घेवुन गेल्या. तेथील आज्या आपल्या व्यथा आता रुपालीताईंशी देखील बोलु लागल्या हे देखील विशेष..!
पुढिल खेपेला डॉ. सोनवणे यांनी येथील काही भिक्षेकरी आज्यांना पिं. चिं. परिसरातील D.Y. पाटिल अथवा इतर रुग्णालयांत डोळे तपासणी व इतर तपासण्यांसाठी घेवुन जायचे ठरविले आहे.
या कामी त्यांना कोणाला काही मदत करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
डॉ. अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट, पुणे
९८२२२ ६७३५७
नेमकं काय करता येईल:
- पिंपरी चिंचवड येथील आपल्या परिचयातील डॉक्टरांकरवी भिक्षेक-यांवर माफक फी मध्ये उपचार अथवा तपासणी करण्याचे आवाहन.
- जरुर भासल्यास हॉस्पिटल पर्यंत ने आण करण्यासाठी वाहतुक व्यवस्था.
- अथवा वेळेवर जी मदत लागेल ती….
मनाला खुप शांति व समाधान लाभत होते.
देव मंदिरात असेल नसेल, पण देवळाबाहेर भेटलेल्या, परिस्थितीमुळे भिक मागत असणाऱ्या आज्यांची सेवा करतांना, देवाचीच पुजा केल्याचे समाधान लाभते…. याचा प्रत्यक्ष प्रत्यय आणि आनंद मनी साठवतच घरी सायकलवरच परतलो!
शब्दांकन-
सुनिल ननवरे,
साद सदस्य/निसर्ग-सायकल मित्र
Hats off to you Abhijeet Sir and Madam
??????