सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

नमस्कार!

प्रिसीजन फाऊंडेशन, सोलापुर तर्फे मी व मनिषा आम्हां दोघांनाही एक पुरस्कार जाहीर झालाय.

त्याचा स्विकार करण्यासाठी आम्ही दोघेही सोलापुरला उद्या येत आहोत.

शिवछत्रपती रंगभवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

बरेच दिवस सोलापुरमधील सहृदांना भेटण्याची इच्छा होती, अनायासे सोलापुरला येतोच आहे, सायंकाळी ६:३० वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे.

तत्पुर्वी सोलापुर मध्ये असणाऱ्या मित्रमंडळींची इथे भेट होवु शकेल.

घेणाऱ्या पेक्षा देणारा नेहमीच श्रेष्ठ असतो… प्रिसीजन फाऊंडेशन चे आभार कोणत्या शब्दांत मांडावेत कळत नाही… काही गोष्टींना शब्द नसतात हेच खरं…

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*