“रंगपंचमीला रंग खेळलात कि नाही डॉक्टर..?”
आज हा प्रश्न खुप जणांनी मला विचारला..!
ज्या पंचावन्न वर्षांच्या ओरिसाच्या बाबांना महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये पाठवलंय कामासाठी, त्या हॉटेलच्या मालकांचा, माझ्या मित्राचा मला फोन आला, बाबा व्यवस्थित रुळत आहेत, सोबत त्यांच्या रेसॉर्टच्या पार्श्वभुमीवरचा या बाबांचा फोटोही त्यांनी पाठवला..!
मी यापुर्वी काढलेला याआधीचा या बाबांचा फोटो सहज पाहिला…
निष्प्राण डोळे, वाढलेली दाढी, आयुष्याचे रंग सारे सुकलेले, विस्कटलेले..!
या फोटोत दोनच रंग… काळा नी पांढरा..!!! बाकी सारंच भकास…
आणि आज मला पाठवलेला हा दुसरा फोटो…
या फोटोत मात्र किती रंग भरलेत…???
ज्यांना धड बसताही येत नव्हतं, ते आज ताठ कण्यानं उभे आहेत, रेसॉर्टच्या पार्श्वभुमीवर..!!!
एखाद्या विशीच्या तरुणासारखे….
तेच निष्प्राण डोळे आता सुर्यासारखे लकाकत आहेत…
लालेलाल रक्त पुन्हा सळसळायला लागलंय धमन्यांतुन, आयुष्याचं आव्हान स्विकारायला…
निळ्या आकाशात उंच भरारी घ्यायला ते पुर्ण तयार आहेत…
सुर्याच्या पिवळ्या किरणांकडुन त्यांनी आत्मविश्वास घेतलाय…
हिरव्या पानांवर पडलेलं “हे” दवबिंदु लकाकतंय आता…
नजर कशी पांढरीशुभ्र स्वच्छ झालीय…
काळ्या रंगाला इथं थाराच नाही… अंधार संपलाय सारा..!!!
आज त्यांनी दिलेल्या याच सा-या रंगांनी मी खेळलो, रंगपंचमी..!!!
I am a housewife and contributing for society as per capacity I would like to work with you in this noble cause for kalyan city,if anything for me please let me know.
Great
Happy journey