भीक नको शीक

हि एक मावशी, हिची मुलगी अंध! दोघी मिळुन भीक मागतात. मुलीच्या मुलाला कसंबसं नववीपर्यंत शिकवलं आणि नववीतच शाळा सोडुन भिकेच्या लाईनमध्ये आणुन बसवलं.

दोघींना समजावुन सांगुन मुलाचं शिक्षण पुन्हा सुरु केलं, आता नववीतुन दहावीत गेला… आज त्याच्या आजीला दहावीची पुस्तकं आणुन दिली!

या मुलाला डॉक्टरच व्हायचंय..!
त्याच्याही जिद्दीला सलाम!

आणखी ५ भिक्षेकरी आजीआजोबांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे, “भीक नको शीक” या प्रकल्पांतर्गत!!!

शाळा सुरु होण्याआधी, योग्य ती मदत त्यांच्यापर्यंत पोचवली जाईल.

हे सर्व तुम्हां सर्वांच्या पाठबळावरच सुरु आहे. अन्यथा आम्हाला हे शक्य नव्हतं, यांच्या आशिर्वादाचे धनी आपण आहात, आम्ही फक्त “वाहक”..!

ऋणी आहे तुमचा असं म्हणुन, मुक्त व्हायचं नाही मला, ऋणांतच राहु दे !!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*