सोहम आयुर्वेदिक चंदनी ऊटणं

नमस्कार !

भिक्षेक-यांचा डॉक्टर या माध्यमातुन, भिक्षेक-यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आपण त्यांना रस्त्यावरच पुरवत आहोत, शिवाय त्यांना ऍडमिट करुन हरत-हेचे ऑपरेशन्स करत आहोत.

यानंतर त्यांना जमतील अशा प्रकारचे व्यवसाय सुचवुन त्यांना आपण व्यवसाय सुरु करुन देण्यास आर्थिक शारिरीक आणि मानसिक मदत करत आहोत.

मागील तीन वर्षांत एकुण ५७ भिक्षेक-यांना व्यवसाय सुरु करुन दिले आहेत… अर्थातच ५७ कुटुंब जगताहेत या प्रकल्पावर..!

आम्ही कुणालाही “भीक” देत नाही… पण स्वाभिमानानं जगायला “मदत” करतोय..!

आपल्या कोणत्याही कृतीमुळे समोरची व्यक्ती Dependant होत असेल तर ती “भीक”..!

पण आपल्या कोणत्याही कृतीमुळे समोरची व्यक्ती Independent होत असेल तर ती “मदत”, इतकं साधं सोपं गणित आम्ही मांडलंय..!

सोहम ट्रस्टच्या अध्यक्षा, डॉ. मनिषा सोनवणे यांनी पुर्णतः आयुर्वेदीय जडीबुटीपासुन बनवलेले… १०० टक्के केमिकल विरहीत (कोणत्याही लॅबोरेटरी मध्ये तपासु शकता) असे उटणे स्वहस्ते तयार केले आहे.

हे उटणं केवळ दिवाळीत न वापरता, जुनाट आणि बरे न होणारे त्वचारोग, अंगावर खाज, त्वचा काळवंडणे, मुरुम / पुटकुळ्या यासाठीही ऊपयुक्त आहे.

भिक्षेक-यांना स्वाभिमानानं जगण्यासाठी “मदत” करता यावी, यासाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतुने आम्ही हे उटणं तयार करीत आहोत.

उटण्याच्या होणाऱ्या विक्रीतुन, भिक्षेक-यांच्या हॉस्पिटलचा खर्च/ डोळ्यांचे ऑपरेशन्सचा खर्च इ. भागवण्यासाठी तसेच त्यांना व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तु विकत घेवुन देण्यासाठी करणार आहोत..!

उटणे घटकद्रव्ये: चंदन, वाळा, कचोरा, ज्येष्ठमध, गुलाब, अनंतमुळ आणि इतर २५ आयुर्वेदिक जडीबुटी

वजन: १ Packet – २५ Gm

किंमत: ६० रुपये

उटणं रोखीनं मिळण्याचं ठिकाण:

Dr. Abhijit / Manisha Sonawane
SOHAM Trust, Om Sai Clinic, near Panchamukhi Maruti Mandir, above Phanase Medical Store, Shivajinagar Gaothan Pune.

फोन: ८३०८३ १५४९४

वेळ: दुपारी १ ते  ४

या व्यतिरिक्त आपण उटणे कुरीअर द्वारे मागवु इच्छित असाल तर खालील बँकेत आपण योग्य ती रक्कम online transfer करु शकता..! (किमान १० पॅकेट्स ऑर्डर आवश्यक )

रक्कम transfer केल्यानंतर आपले नाव , पत्ता व आपल्या ऑर्डरची माहीती ९८२२२ ६७३५७ या नंबरवर पाठवावी…

कोणतेही कुरीअर चार्जेस न घेता आम्ही ते भारतातील सर्व राज्यांत पोचवु…

(Kindly excuse foreign countries)

Bank Details are as follows:

Bank Name:            Syndicate Bank, Aundh Pune
Account Name:      Manisha Sonawane
Account Number:  533 120 100 14061
Type:                        Savings
IFSC Code:              SYNB0005342

Note: 80 G receipt / Tax exemption is not applicable for this transaction

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*