गेल्या १४ वर्षांपासुन पुण्यात भिमथडी जत्रेचं आयोजन होत आहे. या जत्रेचं आयोजन आणि पालकत्व आदरणीय सौ. सुनंदाताई पवार, बारामती यांनी स्विकारलं आहे.
दुर्बल घटकांतील महिलांचे सबलीकरण व्हावे, त्यांना व्यवसायासाठी बाजारपेठ मिळावी व त्यांची सर्वांगीण उन्नती व्हावी हा या जत्रेच्या आयोजनामागचा प्रमुख हेतु!
यावर्षी आदरणीय सौ. सुनंदाताई पवार यांनी सोहम ट्रस्टलाही एक स्टॉल दिला आहे. आम्ही ऋणी आहोत त्यांचे..!
या जत्रेच्या माध्यमातुन भिक्षेक-यांनी बनविलेल्या विविध शोपिसेसचे, पेंटींगचे प्रदर्शन व विक्री करणार आहोत.
तसेच, डॉ. मनिषा सोनवणे यांनी ग्रंथोक्त प्रमाणानुसार बनविलेल्या “आयुर्वेदिक उत्पादनांची” (फेस पॅक, हेअर पॅक, पावडर स्वरुपातील हेअर शँपु, शतावरी कल्प, आवळा कँडी इ. ) विक्रीही याच ठिकाणी करणार आहोत.
जमा होणारा निधी, अर्थातच भिक्षेक-यांच्या वैद्यकीय खर्चासाठी व पुनर्वसनाकरीता वापरला जाणार आहे.
प्रदर्शनात मांडलेली ही कृत्रिम फुलं बनवली आहेत, थकलेल्या भागलेल्या म्हाता-या सुरकुतलेल्या हातांनी… ज्यांना जगण्यासाठी नाईलाजानं भीक मागावी लागते..!
वृद्ध भिक्षेक-यांनी बनवलेल्या या कृत्रिम फुलांना, खरंतर कसलाही सुवास नाही… पण या कृत्रिम फुलांच्या विक्रीतुन, त्यांच्या घरची चुल पेटणार आहे… आणि म्हणुन या फुलांना “भाकरीचा सुगंध” मात्र नक्कीच आहे”..!!!
स्टॉल क्रमांक : १०७
स्थळ : ऍग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड, सिंचननगर, ई स्क्वेअर थिएटर मागे, पुणे.
दिनांक : १८ ते २२ डिसेंबर २०१९
वेळ : सकाळी १० ते रात्री १०
खूप छान कार्य हाती घेतलंय सर तुम्ही… तुमचं लिखाणही खूप हृदयस्पर्शी आहे…