डॉकवॉक

Thank you Doctor..!

“थँक्यू डॉक्टर” ही संकल्पना घेवुन कॅन्सरप्रती जनजागृती करत, डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “डॉकवॉक” हा अनोखा उपक्रम पुण्यात नुकताच पार पडला. महाराष्ट्रातील दिग्गज डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डॉक्टरांनी सादर केलेला “फॅशन शो”, हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण! कॅन्सर च्या तावडीतुन सहिसलामत सुटलेल्या प्रसिद्ध सिने मॉडेल अभिनेत्री लिसा रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

समाजात काम करणा-या डॉक्टरांचा यावेळी यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी माझा आणि डॉ. मनिषाचाही गौरव करण्यात आला.

लोकमत वृत्तपत्र समुहाच्या माध्यमातुन भारतात प्रथमच असा हा सोहळा पार पडला.

सांगायला अभिमान वाटतो की या संपुर्ण कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना माझे मित्र डॉ. सुजीत शिंदेडॉ. लीना बोरुडे यांची..!

या कार्यक्रमाची व्याप्ती पाहिल्यानंतर या दोघांनीही “हिमालय” हातावर पेललाय याची जाणिव झाली!

ऑल दि बेस्ट डॉ. सुजीत आणि डॉ. लिना… We all doctors thanks both of you!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*