या फोटोमधल्या स्त्रिया या महाराष्ट्रातल्या श्रीमंत घरातल्या आहेत (होत्या)!
काही कारणामुळे रस्त्यावर आल्या... सगळे आहेत तरीही निराधार!
ओळख लपवुन त्या भीक मागतात…
माझा यांच्याशी काही दिवसांपुर्वी संपर्क झाला.
मलाच आता मुलगा मानत असल्यामुळे सगळी कर्मकहाणी सांगितल्येय मला यांनी...
भिकेऐवजी सन्मानाने काम करायला मी यांना प्रोत्साहित केलंय आणि या तयार झाल्या आहेत!
यांपैकी एक आई फळं विकणार आणि दुसरी आई लहान मुलांची खेळणी...
मी यांना भेटलो हे यांचं सुदैव म्हणु? की ज्यांनी प्रेमानं मला मुलगा मानलं अशा म्हाता-या आईला या वयात काम करायला लावणारा दुर्दैवी मुलगा म्हणू?
Leave a Reply