नमस्कार,
मागील वेळी मी सांगीतलं होतं की भिक्षेकर्यां-यांच्या रक्ताची तपासणी करणार आहोत, त्यानुसार दि. 23 सप्टेंबर रोजी खालील ठिकाणी रस्त्यावरच या तपासण्यांचे आयोजन केले आहे.
सर्व रिपोर्टस् माझ्याकडेच मी ठेवणार आहे, जेणेकरुन मला त्याचे विश्लेषण (Analysis) करुन पुढील कार्यवाही ठरविता येईल शिवाय हे लोक रिपोर्टस् जपुन ठेवणारही नाहीत.
- मारुती मंदिर, बाणेर फाटा, हॉटेल ग्रीन पार्क समोर
- नवग्रह मंदिर, शनीवारवाड्याजवळ
- शनीपार मंदिर, चितळेंच्या दुकानाशेजारी, बाजीराव रोड
- सकाळी 10.30 -11.30
- सकाळी 11.30 - 1.30
- दुपारी 2.00ते 4.00
या दिवशी आणखी 3 भिक्षेकर्यां-यांनी भीक मागणं सोडुन मुख्य प्रवाहात येण्याचं कबुल केलं आहे, व्यवसाय करण्याचं कबुल केलं आहे...
बरेच दिवसापासुन राहुन गेलेल्या भिक्षेकर्यां-यांच्या रक्त तपासण्या आणि तिघांचं भीक मागणं सोडुन देणं असा दुग्धशर्करा योग जुळुन आलेला, यापेक्षा माझा आणखी भाग्याचा कोणता दिवस असु शकेल?
I have read all the blog its very nice success story.
actually I am social worker working with construction labour and children on health, education and hygiene. i saw the all situation, also i am worked with HIV people in red light area.
Great work sir….