- डोळे तपासणी व मोतिबिंदु ऑपरेशनची पहिली बॅच सुरळीत बाहेर पडली.
- दुस-या बॅचचे रजीस्ट्रेशन चालु केलंय, ही बॅच 14 डिसेंबरला तपासणी साठी घेवुन जात आहे.या बॅचमध्ये 30 लोक आहेत.
डॉक्टर रावळ मॅडमच्या सल्ल्यानुसार यांनाही औषधे / चष्मा अथवा ऑपरेशनची सुविधा दिली जाईल.
प्रत्येक रुग्णास फॉलोआपसाठी 4-5 वेळा न्यावे लागते… सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहुन एकाच दिवशी दवाखान्यात घेवुन जाणे हेच थोडं जिकीरीचं असतं, पण रॉबिनहुड टिम च्या सहाय्याने हे ही काम सुरळीत चालु आहे.
प्रत्यक्ष दवाखान्यात भुवड दांपत्य व पवन लोखंडे यांच्या असण्याने बरेच भार हलके होतात…
- दैनंदिन तपासणी आणि पुनर्वसनासाठी संवाद ही रोजची कामं करत, डोळे तपासणी आणि ऑपरेशन्स च्या या नविन कामात खुप धावपळ /दमछाक होत्येय…
पण… ज्यांनी ऑपरेशन नंतर काम करायचं आश्वासन दिलं होतं, तेच लोक मला आठवणी करुन देत आहेत “डाक्टर, काम बगा की…”
त्यांच्या या आश्वासक वाक्यांनीच खुप आनंद होतो आणि या आनंदात सर्व त्रास विसरायला होतं! जणु, याचसाठी केला होता अट्टाहास …!!!
- एक जण 1 जानेवारी पासुन हॉस्पिटलला वॉर्डबॉय म्हणुन जॉईन होत आहेत.
- दुसरे एक जण MPSC / UPSC च्या प्रायव्हेट क्लासेस मध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शिपाई म्हणुन जॉईन होत आहेत.
- इतर दोघे वजनकाटे घेवुन बसायला तयार आहेत पण त्यांना कुबड्या किंवा वॉकिंग स्टिक द्याव्या लागतील, कारण पायाने ते अधु आहेत… (अधु फक्त पायाने… मनानं आता ते खंबीर आहेत?)
वजनकाटे, कुबड्या आणि वॉकिंग स्टिकची जुळवाजुळव सुरु आहे…
ज्यांनी पुनर्वसित भिक्षेक-यांना ही कामं उपलब्ध करुन देवुन, माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या माझ्या स्नेह्यांना नमस्कार !
एकुण काय तर, ज्या हेतुने ऑपरेशनचे काम चालु केलंय, तो हेतु हळुहळु आपल्या आशिर्वादाने पुर्णत्वास जात आहे…
माहितीसाठी सविनय सादर….!
Leave a Reply