आज १५ ऑगस्ट… प्रत्येकाने आपापल्या परीने तो साजरा केला असेल !
आज मी ही ध्वजवंदन करुन गेलो… माझ्या “आईकडे” तीला भेटायला… आशिर्वाद घ्यायला…!
माझी ही माय मला म्हणाली, “बाळा, काय आशिर्वाद देवु तुला?”
मी म्हटलं… “माई, भिक्षा वाढ… आज स्वातंत्र्यदिन… तुझ्यातले ते तीन रंग माझ्यातही उतरु दे…. दया – क्षमा – शांती !”
डोक्यावर हात ठेवुन माझी माय “तथास्तु” म्हणाली..!
आणि, मी ही निघालो, आईचा हा आशिर्वादाचा हा “तिरंगा” फडकावत..!!!
Leave a Reply