अडीच वर्षापुर्वी हे खुरडत चालायचे…
यांना काठी दिली…
नंतर ऑपरेशन केले…
नंतर कुबड्या दिल्या… कुबड्या घेवुन हे लेडीज स्कार्फ विकायचे,
नंतर यांना व्हिलचेअर दिली… पुन्हा ऑपरेशन…
आता हे स्वतःच्या पायावर उभे आहेत… सर्वार्थानं…
वयानं माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण मला पप्पा म्हणतात..!
मी किती नशीबवान, मला अशी शंभर एक म्हातारी पोरं आहेत…
जगातला पहिला मी असेन… मला शंभर एक बाप आहेत… शंभरहुन जास्त आई आहेत…
त्याहुन जास्त आज्ज्या आणि आजोबा..!
माझ्याएव्हढं श्रीमंत अजुन आहे कुणी…???
खूप महान कार्य करत आहत आपण !