एक बाबा — सगळे असुनही गेल्या १५ वर्षांपासुन फुटपाथवर — गेली ६ वर्षे आंघोळ नाही — अंगावर स्पष्ट दिसतील एव्हढे जंतु अंगावर गुण्यागोविंदानं नांदतात — मागच्या महिन्यात चोरट्याने यांच्याकडे चोरी करण्याचा प्रयत्न केला — यांच्याकडे ४० रुपयांपेक्षा काहीच मिळालं नाही — चोरट्याची मेहनत वाया गेली — चोरट्याने चिडुन बाबांच्या डोक्यात दगड घातला — होना… त्या “बिचाऱ्या” चोरट्याचा वेळ गेला होता — इतके कष्ट का ४० रुपयांसाठी केले ? — एकतर बाबांचे पाय फ्रॅक्चर आहेत — ते रांगत चालातात — आता डोकं फुटलं — चुकुनच माझ्या नजरेत आले — पायाची ट्रीटमेंट केली — हळुहळु उभे राहीले — फुटलेलं डोकं नीट करायचं, तर आधी केस कापले पाहिजेत — डोक्यातले किडे पाहुन, कुणीच तयार होईना — शेवटी महत्प्रयासानं दाढी कटींग केली — भुवड ताईच्या मदतीनं रस्त्यावरच आंघोळ घालुन शुचीर्भुत केलं — शेवटी जखमही ठिक झाली एकदाची..!
हे सर्व जर वेळेत झालं नसतं तर — Infection होवुन बाबांना नाईलाजाने या जगातुन जावं लागलं असतं..!
असो, बाबांची जखम ठिक झाली,
आज बाबा चालताहेत — जखम पुर्ण बरी आहे !
Before After फोटो शेअर करतांना मला मनस्वी आनंद होतोय — आपणां सर्वांचे शुभाशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत… तेच कदाचीत त्यांनाही लाभले असावेत —
अन्यथा पाय तुटुनही कुणी उभं राहु शकतं? डोक्यात दगड पडुनही कुणी जीवंत राहु शकतं?
होय, ज्यांच्या डोक्यावर तुमचे आशिर्वाद आहेत, त्यांचं कुणीच काहीच वाकडं करु शकत नाही..!!!
माझा साष्टांग नमस्कार या आपल्या आशिर्वादाला!!!
खुप खुप भारी वाटलं वाचून ????